२४ फेब्रुवारी २०१० रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सचिनने केलेली नाबाद २०० धावांची अविस्मरणीय खेळी आठवत नाही असा एकही पाठिराखा सापडणार नाही. या सामन्यात सचिनने एक दिवसीय क्रिकेटमध्ये दुहेरी शतक ठोकणारा पहिला खेळाडू होण्याचा मान पटकावला होता. सचिनने या सामन्यात १४७ चेंडूचा सामना करताना २५ चौकार आणि ३ षटकारांची आतिषबाजी केली होती. या कामगिरीची आठवण करत आयसीसीने सचिनचा गौरव केला आहे.‘आजच्याच दिवशी सचिन तेंडुलकरने ग्लालियरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना २०० धावा ठोकल्या होत्या आणि अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू होण्याचा मान पटकावला होता’, अशा शब्दात आयसीसीने सचिनचा गौरव केला आहे. सचिनने केलेल्या विक्रमी खेळीची तोड कोणत्याही फलंदाजाला येणार नाही हे त्रिवार सत्य आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews